राहुलकुमार अवचट
Yavat यवत (दौंड) : दौंड येथे दिवाणी न्यायालय ( वरिष्ठ स्तर ) मंजूर झाल्याबद्दल दौंड बार कौन्सिलच्या वतीने आमदार राहुल कुल यांचा नुकताच सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
वेळ व पैश्याची बचत होणार…!
दौंड वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांची कायदेशीर कामांसाठी होणारी परवड थांबणार असून त्यांच्या वेळ व पैश्याची बचत होणार आहे.
दौंड वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाबाबत आमदार राहुल कुल सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत असून दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दौंडकरांच्या वतीने आभार व्यक्त केले.
यावेळी दौंडकरांना दिलेला शब्द पूर्ण केला. याचा आनंद असल्याची भावना आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली. तसेच याबाबतची सर्व शासकीय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी. व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे कामकाज सुरु व्हावे. यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. असे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी यावेळी दिले आहे.