अजित जगताप
सातारा :महाभारतातील कथेत कुंभकर्ण निवांत झोप काढायचा त्यामुळे अनेकजण आळशी लोकांसाठी हेच उदाहरण देतात. ते वडूज नगरपंचायतीच्या प्रशासनाला लागू होते. अशी चर्चा होत असताना आज मनसेच्या दणक्याने वडूज बस स्थानक परिसरातील सार्वजनिक स्वच्छतालय स्वच्छतेची कामे वडूज नगरपंचायतीकडून सुरू झाली आहेत. यामुळे प्रवाशी वर्गाने मनसेचे सूरज लोहार यांना धन्यवाद दिले आहेत.
खटाव तालुक्यातील वडूज बसस्थानकातील विविध समस्या बाबत मनसेचे जिल्हा संघटक सूरज लोहार यांनी वडुज आगार प्रमुख विक्रम देशमुख यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान आज त्यांच्या निवेदनाची तातडीने दखल घेत वडूज बसस्थानकात असलेल्या स्वचछतागृहांची स्वच्छता कामाची बुधवारी दि २८ सप्टेंबर रोजी सकाळी सुरूवात केली.
वडूज हे तालुक्याचे मुख्य ठिकाण व बाजारपेठ आहे. या ठिकाणी शाळा व महाविद्यालय आहेत. वडूज शहरात शिक्षणासाठी व व्यवसाय कामानिमित्त येणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या अधिक आहे. मात्र, वडुज एस टी बस आगाराच्या हलगर्जीपणामुळे एस टी बसेस वेळेत व उशिरा येण्यामुळे विद्यार्थ्याना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याच बरोबर बसस्थानकात असलेल्या स्वचछतागृहांची दुरावस्था झाली आहे, अशा अनेक समस्या बाबत श्री लोहार यांनी आगार प्रमुखांना धारेवर धरत आक्रमक रित्या आंदोलन करण्याची जोरदार तयारी केली होती.
त्याची गंभीर दखल घेऊन वडूज नगरपंचायत प्रशासनाचे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र काटकर यांनी सफाई कामगार यांच्या पुढाकाराने स्वच्छता गृह स्वच्छ करण्यासाठी हालचाल सुरू केली. यावेळी काही राजकीय पक्षांचे इतर प्रभागातील नगरसेवक बस स्थानक परिसरात हजर होते त्यांनी स्वच्छताबाबत वडूज नगर पंचायत कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना कराव्यात असे वडूज बस स्थानक परिसरात उपस्थित असलेल्या काही ओळखीच्या प्रवाशी व नागरिकांनी सांगितले.
मनसेने आंदोलनाची भूमिका घेतली.त्याची दखल घेऊन त्यानंतर खटाव तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या वडूज एस टी आगारातील बसेस वेळेत सोडल्या अशी प्रतिक्रिया प्रवाशी वर्गाने व विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. वडूज नगरपंचायत मध्ये कार्यक्षम नगरसेवक आहेत. ते आपल्या प्रभागात विकास कामे करून घेतात. तर काहींना आपल्या प्रभागात कामे करून घेण्यासाठी खूपच आटोकाट प्रयत्न करावा लागत आहे. ही बाब सुध्दा प्रकर्षाने जाणवत आहे. याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. या भागातील नगरसेवक व नगरसेविका यांनी ही वडूज बस स्थानक स्वच्छतेसाठी प्रयत्न केले आहेत.त्यांना ही मनःपूर्वक धन्यवाद दयावे लागतील अशी माहिती देण्यात आली आहे.