उरुळी कांचन (पुणे) : भाजप हा तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टाने व संघर्षाने उभा राहिलेला पक्ष आहे. पक्षात कोणताही उच्च, नीचपणा नसून पक्ष प्रत्येकाचे मूल्यमापन करणारा आहे. पक्षाचे कार्यनिष्ठेने करणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्ष
संधी देणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीत बारामती दौरा उरकून उरुळी कांचन शहर युवा वारीयर्स शाखेचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, दौंडचे आमदार राहुल कुल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, युवा वॉरियर्स संयोजक अनुप मोरे, पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, युवा नेते अजिंक्य कांचन, शहराध्यक्ष अमित कांचन, संघटक पूजा सणस, प्रसन्न भोर पदाधिकारी, युवा वॉरियर्सचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना ताकद मिळत नसेल तर ती देण्याचे काम मीच करेल. तसेच उरुळी कांचन शहरातील कामाचा आढावा घेत गौरी गणपती निमित्त शहर भाजपने आयोजित केलेल्या सजावट स्पर्धेत ४०० हून अधिक कुटूंबांनी सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केले.