हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे उरुळी कांचन दौऱ्यावर असल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील इरिगेशन कॉलनी येथे मागील दीड महिन्यापासून खांदून ठेवलेला खड्डा बुजवायला सुरुवात केली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीने वारंवार सदर विभागाकडे खड्डा बुजविण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र सदर घटनेकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. सदर ठिकाणी आजतागायत मोठ्या प्रमानात अपघात झाले आहेत. सामान्य नागरिक, शेजारी असणाऱ्या दुकानदारांनी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी वारंवार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र संबंधित अधिकारी ग्रामपंचायतिचे सरपंच, पदाधिकारी व वाहनचालकांना दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात नियोजीत दौऱ्यावर गुरुवारी (ता. २५) येणार असे समजताच संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज करायला सुरुवात केली.
उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन यांनी उरुळी कांचन यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहायाने पाणी काढून दिले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या विभागातील कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी एक मोठा खड्डा खोडून ठेवला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात झाले. या अपघातात बऱ्याच वाहनचालकांच्या गाड्यांचे नुकसान झाले. याबाबत (NHAI) च्या अधिकाऱ्यांना उरुळी कांचनच्या सरपंच व सदस्यांनी माहिती दिली, निवेदन दिले मात्र खड्डा बुजवला गेला नाही. त्यामुळे खासदार येणार म्हटले कि, एक जेसीबी, रोडरोलर, च्या सहायाने हा खड्डा दुरुस्त केला जात आहे.
याबाबत उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन म्हणाले, “पावसाच्या पाण्यात हजारो नागरिकांनी तक्रारी दिल्या मात्र या तक्रारीकडे दुर्लक्षकरण्यात आले. मात्र खासदार amol कोल्हे येत आहेत. तर लगेच यंत्रणा उपलब्ध झाली. शासकीय अधिकाऱ्यांनी फक्त आमदार, खासदार यांचे दौरे असल्यावरच कामे केली पाहिजे का.? अन्य नागरिकांनी, सरपंच, व पदाधिऱ्यांनी सुचविल्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांनी गरजेचे नाही का..? त्यामुळे सदर अधिकारी हे आमदार खासदार आल्यावरच वाकतात सर्वसामान्यांचे राहिलेले नाहीत.”