युनूस तांबोळी
शिरूर : देशात अवकाळीला सामोरे जाऊन शेतकरी वर्ग मोठ्या समस्यांना सामोरे जात आहे. शेतीमालाला बाजारभाव नसल्याने कवडीमोल भावात उत्पादन विकू लागला आहे. शेतात पिकवायचेच काय ? असा सवाल बळीराजाला पडलाय. मी कृषी मंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणुन लोकसभेत कांद्याच्या माळा घालुन फिरणार होते. तेच भाजपवाले आता कांद्याच्या किमंती मातीमोल झाल्या असताना कुठे आहेत? असा सवाल माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जेष्ट नेते शरद पवार (Sharad Pawar ) यांनी केला.
कृषी मंत्र्यांची भेट घेणार…!
तसेच केंद्रात कांदा प्रश्नावर कृषी मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले. बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या नामकरण समारंभ तसेच आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सात हजार मुला मुलींना मोफत सायकल वाटप पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवारांनी केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणावर टीका केली. या वेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अशोक सावंत, घनश्याम शेलार, पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, जीएस महानगर बॅकेचे अध्यक्ष सुमन शेळके यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पवार म्हणाले की, ”कृषी प्रधान देशातला बळीराजा मोठ्या सकटांत आहे. त्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे. मात्र शासन कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत आहे.” देशात उद्योगपती निर्माण करून त्यांच्या रुपाने सरकार संस्थानिक निर्माण करतय का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कांद्याला एकरी ७० हजार रुपये उत्पादन खर्च होतो. मात्र कांदा विकुन हातात तेवढेही मिळत नाही मग खर्च व घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी कुठून भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेऊन कांदा प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन पवारांनी यावेळी दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??