उरुळी कांचन : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिरूर व हवेलीत राष्ट्रवादीचा दबदबा असताना २००४ साली बाबुराव पाचर्णे आमदार म्हणून निवडून येणे, हे तत्कालीन भाजप आमदारांसाठी आकर्षक होते. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी केले आहे.
शिरुर हवेलीचे लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दिर्घ आजाराने ११ ऑगस्ट रोजी निधन झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौरा उरकून बुधवारी पाचर्णे यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली. तेव्हा त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांचे पुत्र राहुल पाचर्णे, पत्नी मालती पाचर्णे, सून मेघना पाचर्णे, भाजप जिल्हा संपर्क नेते धर्मेंद्र खांडरे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे,सतिश पाचंगे उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, विधिमंडळात २००४ साली एकत्र प्रवेश करताना बाबुराव पाचर्णे यांची शिरुर तालुक्यातील प्रश्न सोडविण्याची तळमळ सातत्याने स्वस्थ बसून देत नव्हती. विरोधी आमदार असताना त्यांनी शेतीला कालव्याने पाणी मिळावे म्हणून प्रयत्न, तालुका दुष्काळ मुक्त व्हावा म्हणून पाठपुरावा, औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरणासाठी प्रयत्न हे मी डोळ्यांसमोर पाहिले आहे.
‘बाबुराव पाचर्णे हे अखंड आयुष्य अजानशत्रू राहिले. त्यांना तालुक्यातील जनतेचा सतत ध्यास होता. त्यांनी विधिमंडळात अनेक प्रश्न मांडून त्यांनी तालुक्यातील प्रश्नांची सोडवणूक केली. २०१९ मध्ये उर्जामंत्री असताना शिरुर शहर व बाबुराव नगर यांना अंडग्राऊंड विज पुरवठा करावा. म्हणून त्यांनी सर्व कामे मार्गी लावून घेतली. वाघोली गावात वाढते विजेचा भार म्हणून त्यांनी माझ्याकडून सबस्टेशन मंजूर करुन घेतले. शिरुर शहरालगत अनेक योजनांना पाणी पुरवठ्यासाठी ते आभार मानायला विसरले नसल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.
दरम्यान, रविवारी (दि.४) रोजी शिरूर संपर्क कार्यालयात सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाचर्णे कुटूंबाची भेट घेतली. यावेळी नगरसेवक नितीन पाचर्णे आदी उपस्थित होते.