Water Sales पुणे : शुध्द व थंड पाणी पुरवठा Water Sales करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात सररासपणे जारचा वापर केला जातो. या जारमुळे अनेकांना व्यवसाय करण्याची संधी देखील मिळाली आहे. लग्न समांरभ, इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच खासगी कार्यालये आणि दुकान दारांची चांगलीच मागणी असते. हे जार कोठून आणले जाते. पाणी शुध्द असते का ?, या भानगडीत सहसा कोण पडत नाही. परंतू आता यावर सरकारची नजर असणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाची परवानगी…!
स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहक जार मधून पाणी विकत घेतात. या पाण्याची शुद्धता, स्वच्छता आणि आरोग्य तपासण्यासाठी सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. या जार मधुन पाणी विकणाऱ्यांना यापुढे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घावी लागणार आहे. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली.
या बैठकीला अन्न व औषध विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे, उपसचिव वैशाली सुळे, यांच्यासह विधि व न्याय विभागाचे उपसचिव मकरंद कुळकर्णी उपस्थित होते.
जार पुरवणाऱ्या व्यवसायिकांना आता सरकारच्या नियमावलीचे पालन करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे देखील परिक्षण केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नागरिकांना अधिक शुध्द आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारे पाणी मिळू शकते.