मुंबई : राज्यातील ११६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज रविवार (ता.१६) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल उद्या सोमवारी (ता.१७) लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे ११६५ सरपंचांचे भवितव्य अवलंबून आहे.
राज्यात १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमध्ये १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे.