हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे)- मतदारांनी पाच वर्षापुर्वी सत्ता दिल्याने, सर्वांना विश्वासात घेऊन मागील पाच वर्षाच्या काळात सुमारे नव्वद कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेसह तब्बल सव्वाशे कोटींच्या आसपास विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. तर आगामी पाच वर्षात रस्ते, पाणी, वीज, अत्याधुनिक जीम, ओपन जीम, स्मशानभूमी, हायमास्टचे दिवे, स्ट्रीट लाईट अशा विविध सोयी-सुविधांचा डोंगर उभा केला जाणार आहे. प्रचारादरम्यान आम्हाला मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पहाता, सरपंचपदासह नवपरीवर्तण पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास नवपरीवर्तन पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मागील पाच वर्षाच्या काळात विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कधीच कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही अथवा राजकारण करताना आम्ही कधीच हेवेदावे केलेले नाहीत, विरोधकांचीही कामे केलेली आहेत. नवपरीवर्तन पॅनेलला मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहुन, विरोधक नको ती टिका करत आहेत. गेल्या पाच वर्षांत विकासाचे एक कोणतेही काम आम्ही शिल्लक ठेवलेले नाही. माझी ताकद हे माझे सर्व कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्वास असणारी सर्व जनता आहे. हीच जनता रविवारी (ता. 18) मतदानातुन विरोधकांना उत्तर देईल अशा विश्वासही सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड व्यक्त केला आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला असुन, नवपरीवर्तन पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड, विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी (ता. १५) दिवसभर घऱोघऱी जाऊन, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी गौरी गायकवाड यांच्या काळात झालेली विविध विकास कामे मतदारांच्या समोर ठेऊन, आगामी पाच वर्षासाठी सत्ता द्यावी असे आवाहनही सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड मतदारांना केले. या दरम्यान ”पुणे प्राईम न्यूज”शी बोलतांना सरपंचपदासह नवपरीवर्तण पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना चित्तरंजन गायकवाड म्हणाले, मागील पाच वर्षांत तत्कालीन सरपंच गौरी गायकवाड यांच्या काळात विविध विकास कामांच्या माध्यमातुन विकासाची गंगा थेट मतदारांच्या घरासमोर आणता आली. गावाचे राजकारण करताना आम्ही कधीच हेवेदावे केले नाहीत, विरोधकांचीही कामे केली आहेत. “विकास करताना कधीच राजकारण करायचे नाही.” हे लक्षात ठेऊनच आम्ही आमची राजकीय वाटचाल चालु ठेवली.
मागील पाच वर्षाच्या झालेली विकास कामे पहाता, विरोधकांना आता टीका करण्याशिवाय दुसरे काहीच काम आम्ही ठेवलेले नाही. यामुळे विरोधक नको ती टीका करत आहेत. मात्र मतदार विरोधकांच्या टिकेकडे एक मनोरंजन म्हणुन पहात आहेत. मतदारांनी सत्ता दिल्यास, पुढील पाच वर्षात प्रत्येक घरी कचरा उचलण्यासाठी व त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी काम करण्यात येणार आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत शहरासारखी स्वच्छ व सोईसुविधांच्या बाबतीत राज्यात अग्रणी ग्रामपंचायत बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही चित्तरंजन गायकवाड यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना विद्यमान सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, कोरोनाच्या काळात आम्ही व आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन, नागरीकांच्यासाठी काम करत होतो. दीड हजारांपेक्षा जास्त नागरीकांना महिनाभर पुरेल एवढे धान्य दिले. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबियांना पन्नास हजारांची मदत मिळवुन देण्यासाठी मदत केली. मागील पाच वर्षाच्या काळात रस्त्यावर उतरुन कामे केल्याने, गावात कोणाच्याही सुख-दुःखात सहभागी होणारे असाधारण नेतृत्व म्हणजे चित्तरंजन गायकवाड अशी ओळख या गावातील सर्वसामान्यात निर्माण झाली आहे.
गौरी गायकवाड पुढे म्हणाल्या, आमचे कुटुंब व आमचे सहकारी ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांच्या सुख-दुःखात सहभागी झालो नसतो तर नागरिकांनी आमच्यावर कायम विश्वास दाखवला नसता. गावातील प्रत्येक नागरिकाच्या भल्याचा कायमच ध्यास घेतला आहे. माझी ताकद हे माझे सर्व कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्वास असणारी सर्व जनता आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विकासासाठी, उद्धारासाठी कायमच कटिबद्ध आहोत, असेही गौरी गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना विजय उर्फ मुकुंद गणपत काळभोर म्हणाले– कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसाठी मागील पाच वर्षात विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांनी नव्वद कोटीच्या पाणीपुरवठा योजनेसह रस्ते, कचरा व्यवस्थापन, बंदीस्त ड्रेनेजलाईन, हायमास्ट दिवे अशी विविध कामे मार्गी लावली. पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यासाठी विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांनी मोठा पाठपुरवा केला होता. पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरु झाले आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी पुन्हा गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांच्या हातात सत्ता असणे गरजेचे आहे. यामुळे मतदारांनी ग्रामपंचायतीचे हित पाहणाऱ्याच्या हातीच सत्ता द्यावी.
यावेळी बोलताना गुरुदेव जाधव म्हणाले- गौरी गायकवाड यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी) व इंडियन ऑईल या कंपन्याकडून गावाच्या सोयीसाठी कचरा व्यवस्थापन व नागरिकांना रस्त्यावर लाईट उपलब्ध करून घेतली. गावातील संपूर्ण रस्ते हे सिमेंट काँक्रीटीकरण करून तयार करून घेतले. ड्रेनेजची व्यवस्था ही जुन्या पद्धतीची बदलून नवीन पाईप लाईन टाकून घेतली. ९० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून तिचे काम प्रगतीपथावर असून नागरिकांना कधीही कमी न पडणारे पाणी मिळणार आहे. पावसाच्या दिवसात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले यावेळी गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड नागरिकांना यांनी मोलाचे सहकार्य केले. नागरीकांच्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्यांच्या हाती मतदारांनीही सत्ता द्यावी.
यावेळी बोलताना कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच देविदास काळभोर म्हणाले – गौरी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील पाच वर्षात पाणी पुरवठा योजनेसह सव्वाशे कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. पाणी पुवठा योजना पुरवठा पुर्ण झाल्यावर नागरीकांना चोविस तास पाणी मिळणार आहे. आपले गाव शहराच्या जवळ असल्याने, मतदारांनी आपल्या गावाचा सर्वांगिन विकास व्हावा यासाठी नवपरीवर्तन पॅनेललाच निवडुन द्यावे.