Vijay Wadettiwar : नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस चांगलाच गाजताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार फटकेबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तिजोरी आणि किल्लीचा संदर्भ देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. “राज्याची तिजोरी बारामतीला आहे, पण त्याची एक किल्ली ठाण्यात असून ओरिजनल चावी मात्र नागपुरात असल्याचा,” खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
वडेट्टीवार यांनी सर्च मुद्द्यावर आज भाष्य केलं. यात बीडमधील जाळपोळ, सोलापूरात ड्रग्जचे कारखाने, यांचा समावेश होता. बीडमधील जाळपोळीच्या घटनेनंतर पोलीस हात बांधून का उभी होती? सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात ड्रग्जचे कारखाने सापडले कसे?असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. गृहमंत्री तुम्ही अनुभवी आहात, मात्र, सरकार तिघांचे असल्याने मी का जबाबदारी घेऊ अशी भूमिका नको पाहिजे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाच आणि ड्र्ग माफियाचे जाळ गुजरातपर्यत जोडले गेले. राज्यातील मंत्रीचे नाव या प्रकरणात येतात यावर खुलासा कधी करणार? असे वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्राचा उडता पंजाब
मुलाना ऑनलाईन गेमिंगपासून दूर करा, अनेक कलाकार ऑनलाईन गेमिंगबाबत प्रसिद्धी देतात. तर, शंभूराजे तुमचे आजोबा कुठे आणि तुम्ही कुठे आहात. राज्यात बिअरचा खप वाढावा म्हणून तुम्ही समिती नेमता, असा टोला वड्डेटीवार यांनी शंभूराज देसाई यांना लगावला. महाराष्ट्रात ड्रग्स लॉबी काम करत आहे. महाराष्ट्राचं उडता पंजाब कोण करतोय. लोकांचं आयुष्य अंधारात कोण ढकलत आहे. या प्रश्नांनी आमच्या काळजाचं थरकाप उडतोय. नाशिक प्रकरणात जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही नक्कीच सांगणार आहे. हे जे काही सर्व सुरू आहे ते कुणाच्यातरी आशीर्वादाने सुरू आहे. राज्यातील 32 लाख लोकं नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. परीक्षेचा गोंधळ आणि बेरोजगारी पाहायला मिळत आहे. पेपर फुटी प्रकरणामुळे तरुण नैराश्यत आहे. या सर्व घटनांना सरकार जबाबदार आहे. जागा रिक्त असताना भरल्या जात नाही, एमपीएससी चा निकाल रखडला जातो. निकाल लागला तरी तरुणाला तीन वर्ष नोकरी लागत नाही. त्यामुळे हा तरुण ड्रग्ज सारख्या मार्गाकडे वळत असल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे.