अजित जगताप
Vaduj News : वडूज : जन औषधी दिन, महिला दिन (People’s Medicine Day) (Women’s Day) व मनसे (Maharashtra Navnirman Sena) वर्धापनदिन (Anniversary) वडूज (ता .खटाव जि. सातारा) (Vaduj News) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सतराव्या वर्धापन दिनानिमित्त (Anniversary) वडूज (ता .खटाव जि. सातारा) (Vaduj ) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात मोफत वैद्यकीय केसपेपर सेवा देण्यात आली. मनसेचे सातारा जिल्हा संघटक युवा नेते सूरज लोहार यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी वडूज (Vaduj News) परिसरातील महिला, वयोवृद्ध, इतर रुग्ण मोठ्या संख्यने उपस्थित होते. (People’s Medicine Day) (Women’s Day)
शासकीय ग्रामीण रुग्णालयात मोफत वैद्यकीय केसपेपर सेवा सुरु
यावेळी शासकीय ग्रामीण रुग्णालयात दोन दिवस शासकीय नियमानुसार जन औषधी दिन, महिला दिन (People’s Medicine Day) (Women’s Day) ही साजरा झाला. त्यामुळे सलग तीन दिवस नियमितपणे जशी रुग्णांची सेवा केली जाते. त्याच्या अधिक पट रुग्णांची रक्तदाब व मधुमेह याचीही तपासणी करण्यात आली.
डॉ बागवान मॅडम, डॉ सम्राट भादुले डॉ ए एस माने, कर्मचारी दिपाली गरवारे व इतर कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.
लोहार म्हणाले,’गेल्या सतरा वर्षात महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून समाज सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या निस्वार्थी मनसैनिकांची फळी निर्माण केली आहे.
यापूर्वी मनसे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी,गरीब व कष्टकरी कुटुंबातील मुलांना खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.’ पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी नुसते फोटोसेशन न करता वृक्षारोपण व त्याची निगा राखली आहे. वाकेशवर येथील युवकाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत स्वकष्टाने काम करून केली आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सचिन खुडे म्हणाले, ‘जिल्हा संघटन म्हणून जबाबदारी सांभाळताना अनेक अनुभव येतात. सामजिक बांधिलकी जपली जात आहे. गरिबांना गरिबांचीच दया येते. त्याप्रमाणे ते काम करतात.त्यांनी दुष्काळी भागात मनसेचे वैचारिक जाळे निर्माण केले आहे.’
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावंत मनसेसैनिक सुर्या सस्ते, विशाल गोडसे, दादासाहेब सुर्यवंशी, उस्मान सय्यद, राजेंद्र लोहार, मन्सुर पटेल, तुषार लोहार, रूषिकेश लोहार, स्वप्निल शिंदे, नवनाथ दणाने, सुरज माळी, महेश मोरे, रोहीत खुडे, निलेश लोहार, ओंकार वायदंडे, साजन घार्गे, तुषार लोहार आदि पदाधिकारी व मन सैनिक उपस्थित होते.