अजित जगताप
पुसेगाव Vaduj News – वडूज (Vaduj News ) शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रचाराची फेरी संपत आलेली आहे. आतापर्यंत उमेदवारांनी प्रत्येक मतदारांच्या दोन वेळा गाठीभेटी घेतलेली आहेत. (Vaduj News ) सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत असून शेती उत्पन्न बाजार समितीला उर्जिता वस्थेत आणण्यासाठी खटाव विकास आघाडीची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यात आलेली आहे. (Vaduj News ) त्यामुळे विजय निश्चितच झाल्याचे मानण्यात येत आहे. (Vaduj News )
शेती उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९६७ साली
खटाव तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या शेती उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९६७ साली आदरणीय तात्कालीन आमदार केशवराव पाटील यांनी केली. त्यांना बुध ता. खटाव येथील संभाजीराव घाडगे व निमसोड ता. खटाव येथील ध्येयशिल देशमुख व अनेक मान्यवरांची मोलाची साथ लाभलेली होती. आज पुन्हा एकदा शेती उत्पन्न बाजार समितीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षविरहित मान्यवर मंडळींनी खटाव विकास आघाडीची स्थापना केलेली आहे.
विकास कामासाठी संपूर्ण खटाव तालुका एकत्र येऊ शकतो हा आत्मविश्वास सभासद व मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे .खरं म्हणजे दूरदृष्टी ठेवून जुन्या जाणत्या नेत्यांनी पुसेगाव, वडूज या ठिकाणी प्रत्येकी सात एकर व पुसेसावळी या ठिकाणी पाच एकर जमीन खरेदी करून ठेवली होती.
आज त्या जमिनीमध्ये शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. वडूज नगरीमध्ये भाजीपाला व जनावरांचा मोठा बाजार त्याचबरोबर पुसेगाव या ठिकाणी आले ,कांदा, बटाटा अशा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.
शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांना शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सन्मानपूर्वक वागणूक मिळावी. या दृष्टीने खटाव विकास आघाडी कटिबद्ध आहे .सदरची जागा ही मोक्याचे असल्यामुळे या ठिकाणी व्यापारी गाळे बांधताना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे .शेवटी प्रत्येक विकास कामासाठी निधीची आवश्यकता असते.
सुदैवाने खटाव विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी कर्तबगार दोन आमदार जयकुमार गोरे ,आमदार महेश शिंदे यांची मोलाची साथ लाभलेली असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या शेतीपूरक योजना राबविण्यात कोणती अडचण येणार नाही. तसेच योगायोग म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र आलेले आहेत.
निवडणूक प्रक्रिया ही औपचारिकता राहिलेली असून हा खटाव विकास आघाडीने विजय नम्रपणे स्वीकारण्यासाठी खटाव विकास आघाडीचे सर्व उमेदवार संयमाने प्रचार यंत्रणा राबवत असल्याबद्दल सभासदांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानलेले आहेत. ट्रॅक्टरने मशागत करून या सर्व जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ट्रॅक्टरच उपयुक्त आहे. असे ग्रामीण भागामध्ये चर्चा सुरू झालेली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Election : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 96.23 टक्के मतदान…!
Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टक्के मतदान..!