अजित जगताप
Vaduj News वडूज : वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या कालावधीमध्ये फेर मतमोजणी मध्य एका मताचा फरक जाणवला. हा फरक जाणवण्यासाठी पराभूत उमेदवारालाच पैसे मोजावे लागले. त्यामुळे खटाव तालुक्यातील सहनिबंधक सहकार कार्यालयातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
१८ संचालक पदासाठी निवडणूक
राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या वडूज शक्ती उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी निवडणूक झाली होती. या वेळेला मतमोजणी करण्यासाठी खटाव तहसील कार्यालयातील मतमोजणी केंद्रात सर्व पॅनल प्रमुख व उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी व समर्थक पत्रकार यांनी मोठी गर्दी केली होती.
सोसायटी मतदारसंघातील ११ ग्रामपंचायत मतदार संघातील ४ व्यापारी व हमाल मापारी प्रत्येकी १, महिला २ आर्थिक दृष्ट्या दुर्बल,१ भटक्या विमुक्त जाती१ अनुसूचित जाती जमाती१ अशा मतदारसंघातील मतमोजणी घेण्यात आली. परंतु अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी विकास पॅनलचे शैलेंद्र वाघमारे यांना ५४३ व त्यांचे प्रतिस्पर्धी खटाव विकास आघाडीचे अमरजीत कांबळे यांना ५४० मते पडली होती. याबाबत धनंजय चव्हाण यांनी लेखी अर्ज करून अनुसूचित जाती जमातीतील मतमोजणी पुन्हा करावी. अशी रास्त मागणी केली होती. त्यासाठी दहा हजार रुपये भरण्याची सूचना केली होती. पण, एवढी रक्कम कोणी भरली नाही.
या फेर मतमोजणीसाठी काही रक्कम भरावी, अशी सूचना देण्यात आली होती. त्याबाबत तातडीने कार्यकर्त्यांनी रक्कम गोळा करून ती जमा केली. त्यानंतर टेबलवर मते मांडून फेर मतमोजणी घेण्यात आली. त्यानंतर दुबार मतमोजणी केल्यानंतर शैलेश वाघमारे यांना एक मत अधिक पडले. ही सर्वानी मान्य केले.
तसेच सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. परंतु, इन कॅमेरा तसेच सहकार विभागाचे अधिकारी कर्मचारी असताना एक मताचा फरक होणे म्हणजे मतमोजणी कामकाज चव्हाट्यावर आल्याची टीका होऊ लागली आहे.
याची कोणीही वाच्यता करू नये. अशी विनंती केल्यामुळे ही बाब निदर्शनास आली नसली, तरी राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या अशा निवडणुकीमध्ये जागृतीने मतमोजणी व्हावी अशी अपेक्षा होती. परंतु, आता एक मताचा फरक झाल्यामुळे नेमकी कोणावर कारवाई होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.