Vaduj News : वडूज : वडूज नगरपंचायतीच्या कार्यालयात सर्व सामान्य माणसांना विविध दाखले व नागरी सुविधांबाबत हेलपाटे मारावे लागतात. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा पाणी सोडण्याबाबत नागरिकांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या जातात. नगरसेवकांकडे दाद मागतात परंतु, काही अधिकारी व कर्मचारी नगरसेवकांनाही दाद देत नाहीत. या विरोधात वडूजचे माजी सरपंच तथा नगरसेवक अनिल माळी, नगराध्यक्ष सौ मनीषा काळे यांचे पती रवींद्र काळे, परेश जाधव यांनी जाब विचारून गाऱ्हाणी मांडली. त्यांचे शांत पणे उपस्थित अधिकारी वर्गाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. (Dignitaries should ask officials in Vaduj Nagar Panchayat against inactive employees)
नगरपंचायतीसाठी सक्षम मुख्याधिकारी पाठविण्याची मागणी
सध्या नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी पद रिक्त असल्यामुळे प्रभारी पद असलेले मुख्याधिकारी यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने किमान आठवड्यातून दोन तासासाठी सक्षम मुख्याधिकारी पाठवावा अशी मागणी प्रतिष्ठित नागरिकांनी केली. (Vaduj News )अगदी तातडीने व काम करण्याचा अनुभव असलेल्या गडचिरोली किंवा चंद्रपूर येथील एखाद्या नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी जरी प्रभारी पद दिले तरी ते आम्ही आनंदाने स्वीकारू असे विजय शेटे म्हणाले. कारण आता नगरपंचायतीच्या कार्यालयात येऊन काम करण्यापेक्षा आता ऑनलाइन पद्धतीने व व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्याच्यात व राज्याचा कारभार करण्याची क्षमता आहे. यावेळी नगर पंचायत अधिकारी अजिंक्य होनमाने व मकरंद जाधव या अधिकारी वर्गाने काळजीपूर्वक प्रतिष्ठित नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
या वेळेला सामाजिक कार्यकर्ते धनाजी चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. (Vaduj News ) नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काही प्रतिष्ठित व जागरूक नागरिक भेटतात. त्यामुळे बरीच कामे मार्गी लावण्यास मदत होते. असे ठेकेदार सतिश पंडित यांनी सांगितले.
आज वाढ दिवसाच्या दुपारच्या सत्रातील सार्वजनिक कार्यक्रमाला बगल देऊन सर्व सामान्य माणसांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी माजी नगर सेवक अनिल माळी यांनी वडूज नगर पंचायत कार्यालयात दोन तास ठिय्या मांडला होता. त्याचे मतदारांनी मनापासून शुभेच्छा देवून कौतुक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Vaduj News : वडूज शेती उत्पादन बाजार समिती प्रायोगिक तत्त्वावर बांधणार गाळे..
Vaduj News : वडूज पोलिसांच्या तत्परतेने तीन अल्पवयीन मुली पुन्हा स्वगृही परतल्या