सुरेश घाडगे
परंडा : देऊळगाव (ता. परंडा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनुराधा विशाल गाढवे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यापुर्वीच्या उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. उपसरपंच पदासाठी आज सोमवारी (ता. १२) ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. हि निवडणूक प्रक्रिया सरपंच सरपंच कोमल बदर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणुन एस.के शेख यांनी कामकाज पाहिले. यावेळी उपसरपंच पदासाठी अनुराधा गाढवे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी शेख यांनी उपसरपंचपदी अनुराधा गाढवे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. तर या निवडणुकीत ग्रामसेवक विठ्ठल गोसकेवर यांनी शासकीय कामकाज पहिले.
उपसरपंचपदी अनुराधा गाढवे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतेषबाजी करून जल्लोष साजरा केला. तर यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गाढवे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजित गाढवे, विकास गाढवे, प्रयागाबाई गाढवे, मनिषा हजारे, शालन भाग्यवंत, प्रविण पाटील, गणेश गाढवे, बंडू बदर,बालाजी बदर, तानाजी ढवळे, भाऊ सुदाम गाढवे, नितिन गाढवे, नागेश गाढवे, इंद्रजित चोबे, मुकुंद गाढवे, उत्रेश्वर ढवळे, रावसाहेब गाढवे, सुधीर बदर, मामा हजारे, संतोष गाढवे, धनाजी गाढवे, तुकाराम गाढवे, भाऊ ढवळे, सुरेश गाढवे,अनिल गाढवे,प्रदीप गाढवे,उमेश गाढवे,दिपक गाढवे,प्रशांत गाढवे,शिवाजी ढवळे, ऋषी गाढवे, खुशालजी गाढवे, संभा गाढवे, गोविंद बदर, रामा ढाळे, विठ्ठल बदर, नागेश बदर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करु. तसेच विकासकामे करीत असताना नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच अनुराधा गाढवे यांनी केले आहे.