उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता भाऊसाहेब तुपे यांची मंगळवारी (ता. १८) बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच अनिता सुभाष बगाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच राजेंद्र बबन कांचन यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत अनिता तुपे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कांचन यांनी अनिता तुपे यांची निवड बिनविरोध घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे. ग्रामविकास आधिकारी यशवंत डोळस हे निवडणूकीचे कामकाज पाहत आहेत.
यावेळी सरपंच राजेंद्र कांचन, मावळत्या उपसरपंच अनिता बगाडे, भाऊसाहेब तुपे, ग्रामविकास आधिकारी यशवंत डोळस, व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.