पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहेत.
अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर्स देखील लावण्यात आले आहे.
ओंकारेश्वर मंदिराचे ते दर्शन घेणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अमित शहांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.आणि खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत.
तर, उद्या अमित शाह हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.