मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शनिवारी (ता.२५) प्रवेश केला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, लोकांना हवी असलेली या भागातले प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचे काम तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथे केले जाईल हा विश्वास आपल्याला मी देऊ इच्छितो.
गेल्या सहा-सात महिन्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केल्यानंतर या राज्यातल्या अगदी जिल्हा जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून शहरातून अनेक लोक अनेक कार्यकर्ते विविध पक्षातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहे. एवढेच नाही तर राज्याच्या बाहेरचे देशभरातले देखील आपले कार्यकर्ते पदाधिकारी राज्य प्रमुख हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनसह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शिवसेना पक्षात जाहीर स्वागत केले आहे.