मुंबई : उद्धव ठाकरे आज माध्यमांशी बोलत होते, तेव्हा त्यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे तुफान फटकेबाजी केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चहुबाजूने टीका करत खरपूस समाचार घेतल.
जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकार अनेक दिवस झालेत मूग गिळून गप्प बसले आहेत त्याबाबत आणि तिथल्या परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी फटकेबाजी केली. त्यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. गेल्या काही तासांमध्ये काश्मीरमध्ये दहशतावाद्यांनी डोके वर काढले असून, तीन ठिकाणी हल्ले झाले आहेत. तर चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागातील परिस्थिती पाहता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मातोश्रीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
सरसंघचालकांना काढला चिमटा
मणिपूरच्या विषयावर काल आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भागवत यांना चिमटा काढला. निदान वर्षभराने का होईना भागवत या विषयावर बोलले तरी, असे ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत गाजावाजा केला, आता जाणार की नाही?
लोकसभा निवडणुकीत भाजपने दरवेळी जम्मू-काश्मीरचा मुद्दा प्रचारात आणला होता. 370 कलम हटविल्याचे कित्येकदा प्रचार सभेत सांगण्यात येत होते. त्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहांचा खरपूस समाचार घेतला. कलम 370 हटविल्याचा या लोकांनी ढोल बडवला. मात्र तिथलं सत्य काय हे आम्ही जनतेसमोर आणलं. त्यावर हे लोक आता काहीच बोलणार नाही. हे कलम हटवून काय फरक पडला? असा सवाल त्यांनी केला. तिकडे लोकांचे जीव जात होते, तेव्हा हे लोक तिसऱ्यांदा सरकार आणल्याची जाहिरात करण्यात व्यस्त असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. आता पंतप्रधान, गृहमंत्री जम्मू-काश्मीरला जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मोदींना देश सांभाळता येत नसेल तर त्यांना पंतप्रधान पदावर बसण्याचा अधिकार नाही, असेहि ते यावेळी म्हणाले.