मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thakare News) शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाने मोठा (big-shock) धक्का दिला आहे. ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासूमाजी मंत्री विश्वासू सुभाष देसाई यांच्या मुलाने (subhash-desais-son-joins-shinde-group) शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. यामुळे राजकारणाच चांगलीच खळबळ उडाली आहे. पक्ष प्रवेशामुळे उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठा धक्का दिला असल्याची चर्चा रंगली आहे. (Uddhav Thakare News)
माजी मंत्री विश्वासू सुभाष देसाई यांच्या मुलाने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश
विश्वासू सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज बाळासाहेब भवन येथे त्यांचा पक्ष प्रवेश झाला. सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे. 2014 च्या भाजप-सेना युतीच्या काळात आणि महाविकास आघाडीमध्ये ते उद्योगमंत्री होते. त्यांचा विधान परिषदेतील कार्यकाल संपल्यानंतर त्यांना पुन्हा आमदारकी देण्यात आली नव्हती.
भूषण देसाईंचा शिवसेनेशी कोणाताही संबंध नाही कोणाला वॉशिंगमशीनमध्ये जायचे असेल तर जाऊ शकतात. सुभाष देसाई शिवसेनेशी निष्ठावान आहेत. ते 24 तास पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काम करतात. भूषण देसाई यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला. ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.
– सुभाष देसाई, शिवसेना नेते