पुणे : विधान परिषदेतील संख्याबळाचा विचार करत उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलला आहे.
उद्धव ठाकरे यांनी बदलेल्या निर्णयामुळे ते पुन्हा परत येणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी राजीनामा न देण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी इंडिया टुडे- सी व्होटरच्या सर्व्हेत भाजप-शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तर तिकडे संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून संबोधलं होतं. यावरून शिंदे गटात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे एकदाही सभागृहात दिसले नाहीत. मात्र आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सभागृहात दिसणार आहेत.