राहुलकुमार अवचट
यवत – खामगाव (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार राहुल कुल गटाचे तुषार बहिरट यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या आदीचे उपसरपंच कैलास खेडेकर यांनी एक महिन्यापुर्वी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद हे रिक्त झाले होते. या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया सरपंच सरपंच योगेश मदने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तर या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक पी. बी. नाळे यांनी शासकीय कामकाज पहिले.
या निवडणुकीत तुषार बहिरट यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी पी. बी. नाळे यांनी त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव चोरमले, यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच तुषार बहिरट यांचा सन्मान करण्यात आला.
सर्वानुमते माझी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानतो. आणि दौंडचे कार्यसम्राट आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. असे बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच तुषार बहिरट यांनी सांगितले.