अजित जगताप
सातारा : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक वाहिनी ठरलेल्या साताऱ्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सत्ताधारी मंडळींविरोधात बँकेच्या सभासदांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे सर्व समावेशक सभासद परिवर्तन पॅनेलची निर्मिती करण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते संभाजीराव थोरात, उदय शिंदे, बळवंत पाटील यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
परिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्य अध्यक्ष उदय शिंदे, पॅनेलच्या मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील, अखिल भारतीय शिक्षक संघाचे दोंदे गटाचे नेते दीपक भुजबळ, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.
प्राथमिक शिक्षक बँकेचे सुमारे दहा हजार सभासद आहेत. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी २१ जागेसाठी २१ अभ्यासू उमेदवारांची सर्व समावेशक सभासद परिवर्तन पॅनेलमध्ये निवड करण्यात आली आहे. यासाठी अनेक मान्यवर शिक्षकांनी मोठ्या मनाने उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर काही सभासदांनी स्वयंस्फुतीने प्रचार यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे सभासद परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित झाला आहे. विक्रमी मतांनी सर्व उमेदवार विजयी होणार असा आम्हाला आत्मविश्वास असून असून पुढील पाच वर्षात बँकेमध्ये पारदर्शक व विश्वासदर्शक कामकाज केले जाणार आहे.
मागील चार वर्षाच्या कालावधी शिक्षक बँकेत आर्थिक लूट व नोकर भरतीने गरीब शिक्षकांच्या बँकेला आर्थिक फटका बसला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बँकेची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज सर्व सभासद शिक्षकांनी बोलून दाखवली आहे.
परिवर्तन पॅनलने मतदारसंघनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे :
मनोहर माने (आरळे), नानाजी कुंभार (परळी), विशाल कणसे (नागठाणे), संजय नांगरे (कराड- पाटण), नितीन (शिर्के (कोरेगाव), सुरेश पवार (रहिमतपूर), नवनाथ जाधव (खटाव), आबासाहेब जाधव (मायणी) संजीवन जगदाळे, (दहिवडी), विजय बनसोडे (म्हसवड), शशिकांत सोनवलकर (बरड), राजेंद्र बोराटे (गिरवी फलटण), विजय ढमाळ (खंडाळा), नितीन फरांदे (वाई) संजय सपकाळ (महाबळेश्वर), श्यामराव जुनघरे (जावळी) महिला राखीव गट – सौ निशा मुळीक, सौ पुष्पलता बोबडे, मागासवर्गीय गट – ज्ञानबा ढापरे, भटके विमुक्त जाती गट- नितीन काळे, इतर मागासवर्गीय गट- किरण यादव बँकेचे हित जपण्यासाठी ज्यांनी उमेदवारी मागे घेतली त्या सर्वांचे आभार यावेळी मानण्यात आले.या वेळी शंकर देवरे, सुभाष ढालपे, नवनाथ भरगुडे, दीपक गिरी, विठ्ठल फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रचाराचा शुभारंभ रविवारपासून
रविवार, दि. 6 रोजी सातारा येथे कुरणेश्वर- गणपती मंदिर येथे सकाळी दहा वाजता प्रचार शुभारंभ व मेळावा होणार आहे. शिक्षक नेते व सभासद यांच्या उपस्थितीत यावेळी प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पॅनल तर्फे करण्यात आले आहे.