मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांवर होणारी आजची सुनावणी न्यायमूर्ती कृष्णमुरारी सुट्टीवर असल्याने पुढे ढकलण्यात आली. १६ आमदाराच्या अपात्रतेच्या विषयावर आजची सुनावणी होणार होती, मात्र आता पुढची सुनावणी कधी घेण्यात येणार आहे, हे स्पष्ट करण्यात आले नाही.
ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई याच्या वतीने १६ आमदाराच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांना याबाबत आपले म्हणणे लेखी मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते . यानुसार दोन्ही गटांनी तयारी केली होती. मात्र, आज या प्रकरणावर सुनावणी झाली नसून पुढील तारखे संदर्भात देखील कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत.
सत्ता संघर्षसातील सुनावणी २७ सप्टेंबर नंतर आज (२९ नोव्हेंबर) घेण्यात येणार होती. मात्र यापूर्वी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी घटनापीठासमोर युक्तिवाद केला होता.
न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या घटनापीठात न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिंहा यांचा समावेश आहे.
विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील 15 आमदारांना निलंबनाची नोटीस बजावली. त्याविरोधात एकनाथ शिंदे यांनी 27 जूनला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
उपाध्यक्षांची नोटीस अवैध आहे आणि तात्काळ याला स्थगितीची मागणी करण्यात आली आहे. तसेच बंडखोर आमदारांनी निलंबित करण्याची शिवसेनेची याचिका आहे. 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.