दीपक खिलारे
इंदापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये होत असलेल्या मुस्कटदाबीला कंटाळून इंदापूर येथील पदाधिकाऱ्यांनी माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीमध्ये (दि.३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेत विविध पदांवर प्रामाणिकपणे काम करुनही आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत ठाकरे गटाचे इंदापूर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चौगुले व इंदापूर तालुका क्षेत्रप्रमुख सुरज काळे यांनी सासवड येथे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंदर जेवरे, बबन खराडे, आण्णा काळे, इंदापूर शहर प्रमुख अशोक देवकर, अवधूत पाटील, बालाजी पाटील आदी उपस्थित होते.