पुणे Politics : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून गौप्यस्फोट आणि दावे-प्रतिदावे केले जात आहे. यामुळे राजकार ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार महाविकास आघाडीवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Politics)
राज्याच्या राजकारणात 15 दिवसांत मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते
आंबेडकर म्हणाले ”15 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. आणि एक नसून दोन बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शिवसेनेबरोबर वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरु असून आमच्या युतीची काळजी करु नये, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
पुलवामा बाबत त्यावेळी मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली. तीला प्रोटेक्शन नव्हतं. ही माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होतं. असा आरोप त्यांनी केली आहे. तसेच दहा गाड्या कॅनॉव्ह बद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे. ती बाब यांना नसावी. याची साधी चौकशी देखील नाही. राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असेही त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना तुरुंगात टाकणार : प्रकाश आंबेडकर
‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला…!
आंबेडकरी समाजाने राजकीय दृष्ट्या एकत्र यावे- आनंदराज आंबेडकर