अमोल दरेकर
पुणे : शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या ताकतीवर त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेने एकदाही बहुमत दिले नाही. व एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केला नाही. असे विधान कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
मंचर येथे येथील एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरील विधान केले आहे. पुढे बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले कि, आपण अजूनही भाजप सोबत गेलेलो नाही. तर आपला पक्ष हा राष्ट्रवादी काँगेस हाच आहे आणि आपण अजूनही राष्ट्रवादी काँगेस पक्षामध्येच आहोत. तर चिन्ह कोणाला मिळेल नाव कोणाला मिळेल, याबाबत निवडणूक आयोग निर्णय देईल. मात्र त्यांचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक पंचायत होऊ शकते.
दरम्यान, एकीकडे ममता बॅनर्जी, मायावती या मुख्यमंत्री होतात तर अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष पुढे जातायत आणि आपले नेते उतुंग असताना आमचे ६० ते ७० आमदार निवडून येतात. आणि कोणासोबत तरी आघाडी करावी लागते. म्हणूनच हा निर्णय झाला असल्याचा खुलासा दिलीप वसे पाटील यांनी केला आहे.