अजित जगताप
सातारा : सध्या देश व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. प्रत्येक पक्षात स्वयंभू नेत्यांनी पक्षावर कब्जा ठेवला होता. परंतु, आता वंचित बहुजन आघाडीने मोकळा श्वास घेतल्याने प. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदरणीय बहुजन नायक ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन समाजाला एकत्रित करून मोठा लढा उभारला आहे. अनेक जाती धर्माच्या लोकांनी आता पर्याय निवडला असून सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे अशा पश्चिम महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आगेकूच करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई,महासचिव तुषार बैले, गणेश भिसे, सातारा शहराध्यक्ष मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष अमोल गंगावणे व तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत, संदीप कांबळे, शशिकांत गंगावणे, दिपक चव्हाण यांच्या सारख्या वैचारिक बैठक असलेल्या कार्यकर्त्यानी पक्षाचे धेर्यधोरण सर्व वंचित घटकांपर्यत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरी जाताना वैचारिक बैठक असणाऱ्यांची खरी लढाई सुरू होणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोबत येण्यासाठी विविध राजकीय पक्ष नेते संपर्क साधून विचारणा करीत आहेत.
फलटण, सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, खटाव, खंडाळा, महाबळेश्वर, वाई, माण,जावळी तालुक्यातील प्रमुख गावात समविचारी कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडी सोबत राहण्याचा निर्धार केला आहे. ऍड बाळासाहेब आंबेडकर ही व्यक्ती नसून विचार आहेत. त्यांनी ज्यांना स्वाभिमान शिकविला. अशा लोकांनाच समाज मान्यता मिळू लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील अलिकडच्या काळात सुमारे अठरा हजार क्रियाशील सभासदांचा पहिला टप्पा गाठला आहे.सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, महिला वर्ग तसेच युवकांना आघाडीच्या वतीने सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने प्रोजेक्ट तयार केले आहे. त्यादृष्टीने समाज्यातील योगदान देणाऱ्या घटकांचे सहकार्य लाभले आहे.
पक्षाच्या भूमिकेतूनच ग्रामीण भागात स्वाभिमानी फळी तयार झाली आहे. त्यांनी काही चिल्लर गॅंगला त्यांची जागा दाखवून दिली असल्याने त्यांचा विषय संपला असल्याचे मनोगत व्यक्त होत आहे. किमान पाच जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती सदस्य निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वाटचाली बद्दल पक्ष नेतृत्वाने ही समाधान मानले असल्याचे तुषार बैले, अमोल गंगावणे यांनी सांगितले.