नागपूर : राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरु आहे. १९ डिसेंबर पासून सुरु झालेल्या या अधिवेशनातील पहिला टप्पा आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरींमुळे गाजला. मात्र, सरकार व विरोधक आता आजपासून सुरु होणाऱ्या शेवटच्या आठवड्यात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
विरोधक व सत्ताधारी दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याने, हा अधिवेशनाचा शेवटचा आठवडा कसा मार्गी लागणार हे पाहणी उत्सुक्याचे ठरणारे आहे.
राज्यपाल, महापुरुषांवर केली जाणारी वक्तव्ये यांवरून अधिवेशनाची सुरुवातच वादळी झाली होती. त्याचा समर्थपणे सामना करताना विरोधकांचे अनेक मुद्दे सत्ताधारी पक्षाने खोडून काढले. यातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सुशांत सिंग राजपूत व दिशा सालियन प्रकरणीटिपणी करताना माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
त्यानंतर सत्ताधारी पक्षाने आक्रमकाने हा मुद्दा रेटून नेताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी समितीची स्थापना करताना चौकशीचे आदेश दिले. यामुळे विरोधक थोडेशे बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले. या प्रकरणाचे विधीमंडळाच्या बाहेर देखील पडसाद उमटले.
आदित्य ठाकरे यांचे नाव पुन्हा एकदा या प्रकरणात आल्याने सत्ताधारी आमदार यांनी देखील यावर भरपूर तोंडसुख घेताना एकप्रकारे हल्लबोलच केला. आता अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे ही पिता पुत्रांची जोडगोळी सत्ताधारी पक्षाच्या आरोपांचे खंडन कशाप्रकारे करतात हे, हे पाहणे गरजेचे आहे.
खासदार संजय राऊत विधीमंडळाच्या बाहेर वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. परंतु सत्ताधारी पक्षाच्या रेट्यामुळे आता ठाकरे गट या प्रकरणात कशा प्रकारची भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी पक्षाच्या वतीने चर्चेसोबतच राज्यात विविध योजनांसाठी, कामांसाठी देखील निधीची मोठ्या प्रमाणात तरतूद केली. अधिवेशनात पाहिल्याच दिवशी सत्ताधारी ५२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या देखील मान्य केल्या आहेत. तसेच विविध योजानांसाठी देखील भरीव निधीची तरतूद केली आहे.
सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना निधीची वाटप जास्त प्रमाणात करण्यात आले, असा आरोप देखील विरोधकांनी केला.