अजित जगताप
नागपूर – गेल्या दिड दशकापासून राष्ट्रीय कॉंग्रेस आघाडीमध्ये मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म न पाळता पीपल्स रिपब्लिकन पक्षाची उपेक्षा व विश्वासघात केला आहे, त्यामुळे कॉंग्रेस सोबतची सर्व पातळीवरील आघाडी संपुष्टात आली आहे. अशी घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी नागपूर येथे केली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीला इतर राजकीय पक्षा कडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आघाडीचा विचार देखील केल्या जाईल अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला लाँगमार्च प्रणेता, माजी खा. प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या भीमसैनिकांच्या मेळाव्याला प्रा. कवाडे बोलत होते.
देशभरात विघटनवादी प्रवृत्तीचा धार्मिक उन्मादामुळे राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेला बाधा पोहचली आहे.केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवून संविधान बदलवू पाहत आहे. संविधान वाचविण्या साठी भिमसैनिकांनी प्राणाचे मोल देण्याची तयारी ठेवली आहे. असे ही प्रा. जोगेन्द्र कवाडे ठणकावून सांगितले.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवानेते जयदीप कवाडे यांनी निमंत्रीत केलेल्या ‘सांस्कृतीक दहशतवाद बिमोड भीमसैनिक मेव्याचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपावराव आटोटे यांचे हस्ते करण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अकरा ठराव करण्यात आले . वाढल्या अत्याचारास प्रतिबंध घालणे, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अमंलबजावणी, बेरोजगारीची समस्या दुर करणे, मागासवर्गीय कर्मचान्याचे नोकरीतील तेहतीस आरक्षण पूर्ववत चालू करणे शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करणे, खाजगीकरणाचे कारस्थान थांबविणे. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करणे, महागाई कमी करणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याना सरसकट आर्थिक मदत करणे.
संविधानाचे रक्षणार्थ तथा सांस्कृतिक बिमोड करण्या साठी- कोल्हापूर ते चैत्यभूमी यात्रा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व कार्याध्यक्ष घोषीत करणे.असे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.या वेळी भिमसैनिकांनी प्रा. जोगेन्द्र कवाडे सर आगे बढो,, हम तुम्हारे साथ हैं। युवानेते जयदीप भाई आगे बढो,, च्या जोरदार घोषणा देवून स्वागत केले.
यावेळी मंचावर युवा नेता जयदीप कवाडे, जे. के. नारायण, गणेशभाई उन्हवण, चरणदास इंगोले, बापुसाहेब गजभारे, प्रमोद टाले. विजय वाघमारे, छत्रपालसिंह (हरियाणा), राजकिशोर आनंद (नवी दिल्ली), रशभाई सोनवणे (गुजरात), इंद्रजित घाटे, भगवान आढाव, प्रा, पुरुषोत्तम पाटील, अनिल तूरुकमारे, नरेंद डोंगरे, दिलीप भिसे, दौलत हिवराळे, युवराज कामळे, मेघराज डोंगरे, राजेश जाधव, भगवान कामळे, महिला आघाडीच्या सुवर्णा वानखेडे, सविताताई नारनवरे, मिनाबाई अविंग, संजय खांडेकर, प्रा. मुनेश्वर बोरकर, अरुण वाहने, सुमेध मुरपाठकर च्यासह विविध राज्यातून आलेले नेतेगण उपस्थित होते.