अजित जगताप
सातारा : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भिगवण ता पुणे येथील आंदोलनकर्त्यांनी उपोषणाच्या तेराव्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागातील १३ मुद्दांवर अद्यापही कारवाई केली नाही त्याच्या निषेधार्थ हे पाऊल उचलले आहे अशी माहिती आंदोलनकर्ते अमर एकाड यांनी दिली आहे.
याबाबत आंदोलनकर्त्यांनी आरती करून जयदेव जयदेव जय आंधळेश्वर,,, जय धनेश्वर,,भ्रष्ट आहे फार,,, घरी पाठवा लवकर, उच्च शिक्षण खात्यात घोळ घातले फार,,,, प्राचार्य भरतीत लाच खातो भरपूर,,,,,याच्या विरोधात तक्रारी फार,,,,तरी याला आहे कोणाचा आधार,,,,जयदेव जयदेव जय आंधळेश्वर,,, जय धनेश्वर,, भ्रष्ट आहे फार,, घरी पाठवा लवकर, लिहिण्या ,वाचण्या याला लागतो आधार, धनादेशावर करतो चुकीची मोहर,,,,शिक्षण खात्याचे केले वाटोळे फार,,,,अशा पद्धतीने आरती करून सॊशल मीडियावर पोस्ट व्हायरल सुध्दा केली आहे.
नाईकनवरे यांच्या सेवासमाप्तीच्या, पर्यंत वेतन फरक तात्काळ अदा करणे, तत्कालीन मुख्य लिपिक उच्च शिक्षण संचालनालय पुणे यांना असभ्य व बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी उच्च शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांचे किमान दोन वार्षिक वेतनवाढी बंद करून त्यांची नोंद सेवापुस्तकात घेण्यात यावी, सहयोगी प्राध्यापक आवश्यक ती पात्रता धारण करीत असूनही त्यांना कॅस योजनेअंतर्गत प्राध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली नसल्याचे निर्देशनास येते. पात्रताधारक सहयोगी प्राध्यापक यांना त्यांच्या मुलाखतीच्या दिनांकापासून पदोन्नती देण्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही, उच्च शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांची वैद्यकीय तपासणी तात्काळ निष्पक्षपणे करून, त्याचा अहवाल मिळावा,
नाशिकचे तीन अपत्य असलेले प्राचार्य पदावर केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करावी, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक भरती सुरु करण्याची कारवाई तात्काळ करावी, महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य यांना अवैधपणे ६२ ते ६५ पर्यंत वयोमर्यादा वाढ करून दिल्याबाबत तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून प्राचार्य पदावर केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करावी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नकारात्मक शिफारस केली तीच मा. संचालक उच्च शिक्षण यांनी सकारात्मक प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी का पाठवला? व शासनाने कोणत्या नियमाच्या आधारे वयोमर्यादा वाढीची मंजुरी दिली, यांचा लेखी स्वरुपात खुलासा द्यावा.असे व अन्य प्रश्न निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणात आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्रातील राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना लेखी स्वरुपात तक्रार करूनही अद्यापही कोणती कारवाई झाली नाही.या विरोधात आंदोलनकर्त्यांनी तसेच दि २० सप्टेंबर २०२२ पासून मुंबईत आझाद मैदानवर आंदोलन सुरू केले आहे.त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली आहे.श्री अमर जालिंदर एकाड