उरुळी कांचन (पुणे) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दूरदृष्टीतून ७५ वर्षांपूर्वी उरुळी कांचन (ता. हवेली) सारख्या ग्रामीण भागात निसर्गोपचार केंद्र सुरु केले. ते आजही लोकांना उपयुक्त ठरत आहे. हे भारताच्या स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वी उचललेले योग्य पाऊल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे भाजपाच्या लोकसभा प्रवास योजना’अंतर्गत शिरुर लोकसभा प्रवास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी येथील निसर्गोपचार आश्रम केंद्राला भेट दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी रेणुका सिंह बोलत होत्या.
यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या स्थानिक प्रभारी आमदार माधुरीताई मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, दौऱ्याचे संयोजक भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अॅड. धर्मेंद्र खांडरे, राज्य कार्यकारणी सदस्य रोहिदासशेठ उंद्रे, प्रदीप कंद, सुदर्शन चौधरी, दादासाहेब सातव, संदीपआप्पा भोंडवे, शामराव गावडे, स्वप्निल उंद्रे, जनार्दन दांडगे, गणेश चौधरी, कमलेश काळभोर, पुनमताई चौधरी, प्रतिभाताई कांचन, सारिका लोणारी, सुप्रिया गोते, रूपाली कांचन, सीमा जगताप, पूजा सणस, वंदना पवार, काजल खोमणे, सौ शिवले ताई, सौ चोपडा ताई, विकास जगताप, अमित कांचन, सचिन काळे, प्रसन्न भोर, भाऊसाहेब कांचन, ऋषिकेश शेळके, गणेश घाडगे, संतोष घोलप, किरण कुंजीर, अभिजीत महाडिक, गुरुनाथ मचाले, मच्छिंद्र कड, आबासाहेब चव्हाण, ओंकार कांचन, ऋतिक तुपे, सिद्धार्थ जगताप, निखिल चोरडिया, गणेश कांबळे, अमित तुपे, दादा खोमणे, ओंकार मांढरे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना रेणुका सिंह म्हणाल्या, “नगर रोडवरील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना काही अडचणी सतावत आहेत मात्र त्यावर योग्य त्या पद्धतीने तोडगे काढली जातील. तीन दिवसांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रवास कार्यक्रमांतर्गत दौरा केला. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की भाजप हा मजबूत पक्ष आहे आणि या पक्षाला शिरूर लोकसभा मतदारसंघात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत राहील याची खात्री या दौऱ्यातून झाली आहे.”
दरम्यान, सर्वसामान्यांची प्रगति, देशाचा विकास हेच भारतीय जनता जनता पक्षाचे ध्येय आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये समस्यांची माहिती घेण्यासाठी मी आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या जाणून त्या सोडवणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा अभ्यास करून या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना कसा देता येईल याची माहिती घेण्याचे आवाहन यावेळी सिंग यांनी केले.