शिर्डी : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाहानातून नागपूर ते शिर्डी अशा मार्गाची पाहणी प्रत्यक्ष वाहानातून केली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवली यावेळी शिंदे त्यांच्या शेजारी बसले होते. शिंदे फडणवीस यांचा ताफा ताशी १८० पेक्षा जास्त वेगाने प्रवास करत होता. यामुळे सर्वात जास्त चर्चा झाली ती, देवेंद्र फडणवीस यांनी चालविलेल्या मर्सिडीझ गाडीची.
या महामार्गाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी निळसर रंगाच्या ‘मर्सडीज बेन्ज’ कंपनीच्या एम एच ४९ बीआर ०००७ या गाडीतून प्रवास केला. फडणवीस थेट शिंदे यांच्या सारथ्यासाठी बसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. या गाडीची किंमत १.७२ कोटी असून पूर्ण प्रवासास फडणवीसच्या गाडीच्या मागे ताफ्यातील सर्व वाहने धावत होती.
काल या महामार्गावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टेस्टिंग केले. यावेळी वाशीम जिल्ह्यातील ईराळा येथील बेसकॅम्प जवळ गाड्यांचा सुसाट वेगाने ताफा आला आणि पाहता पाहता सुसाट वेगाने निघून देखील गेला.
यावेळी त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या डीबी पथकाची वहाने, इतर महागड्या गाड्या देखील मागेच राहिल्या. त्यांना देखील फडणवीस चालवत असलेल्या गाडीच्या वेगाची बरोबरी साधता आली नाही. त्यामुळे त्यांच्या गाडीचा वेग पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या.