अजित जगताप
कराड : सातारा जिल्ह्यात शेरे ता कराड येथीलगेली पस्तीस वर्ष आंबेडकरी चळवळी मध्ये निस्वार्थी पणे काम करणाऱ्या बुद्धवासी बनुताई येलवे या शेरे तालुका कराड येथे कच्च्या घरात राहत होत्या. पण आंबेडकरी विचार पक्के होते असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले
शेरे ता.कराड येथील विठ्ठल-रखमाई मंदिर परिसरात झालेल्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी परशुराम वाडेकर,असिफ गांगुर्डे,शहाजी कांबळे, सुनील सर्वगोड,आर पी आय सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड,अजित जगताप,उपाध्यक्ष कुणाल गडांकुश,राजेंद्र जगताप, डॉ संपतराव कांबळे ,आप्पासाहेब गायकवाड ,श्रीमती येलवे यांची मुलगी कमल सावंत , शेरे गावच्या सरपंच संगीता निकम,माधुरी टोनपे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज व बनुताई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आठवणींना उजाळा दिला. बुद्धवासी बनुबाई येलवे यांचे दि.२४ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांची श्रद्धांजली सभा शेरे गावात आयोजित करण्यात आली होती. या श्रद्धांजली सभेला दिल्लीतून थेट ना.रामदास आठवले कऱ्हाड च्या शेरे गावात आले. छोट्या गावातील एका कार्यकर्ती च्या दुःखात ना.रामदास आठवले जाणीव ठेवून सहभागी होतात याबद्दल शेरे ग्रामस्थांनी ना.रामदास आठवले यांचे आभार मानले.
बनुबाई येलवे या रिपब्लिकन पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी गावात कधी ही कुणावर दबाव आणला नाही.त्यांनी ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाला निष्ठावंत राहून साथ दिली. सातारा सांगली कोल्हापूर येथील सभांना रिपाइं नेते आठवले येत असत तेंव्हा त्या भाजी- भाकरी ठेचा तसेच भाजी घेऊन येत होते. याची आठवण यावेळी ना.रामदास आठवले यांनी सांगितली.
नामांतर लढ्यात सातारा भागातून मुंबईत मोर्चाला शेकडो महिला आणत असत. तलाठी काम करीत नसेल तर तलाठी कार्यालयाला कुलूप लावण्याचे आंदोलन करीत होत्या. एकट्यानी रेल्वे रोको आंदोलन ही केले होते. त्यांनी जनतेची समाजाची निस्वार्थ सेवा केली. अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्या होत्या.
बनुबाई येवले या स्वतःसाठी नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या झेंड्यासाठी; समाजासाठी त्या जगल्या. त्यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षाचे कधीही भरून येणार नाही.त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते.त्यांच्या अनेक आंदोलन आणि कार्याच्या आठवणी रिपब्लिकन चळवळीत त्या अजरामर राहतील.त्यांच्या जाण्याने रिपाइं पक्षाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.शेरे ग्रामस्थांच्या वतीने संभाजी निकम- पाटील, बनुताई यांची कन्या कमल सावंत,गणेश भोसले यांनी ही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमानंतर मंत्री आठवले यांनी बनुताई यांचे नातेवाईक सचिन दगडू येलवे, सौ प्रियांका येलवे यांच्याकडे रोख पंचवीस हजार रुपये सुपूर्द केले तसेच घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला माधुरी टोनपे अजिंक्य वाघमारे, अजित कंठे, संतोष भंडारे, आप्पा तुपे, आण्णा वायदंडे, शहनवाज काजी व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य दिपक सावंत यांनी आभार मानले.