पुणे- ग्रामपंचायत सदस्य असतांना, ग्रामपंचायतीच्या एका मासिक सभेत नियमबाह्य ठरावाला सुचक व अनुमोदक झाल्याने मांजरी खुर्दचे विद्यमान सरपंच निखील उत्तम उंद्रे यांना सरपंचपदावरुन हटविण्याबरोबरच, त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उंद्रे यांनी 22/03/2021 रोजीच्या मांजरी खुर्द ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत, नियमबाह्य ठराव झाल्याचे व त्या ठरावाला निखील उत्तम उंद्रे सुचक व अनुमोदक असल्याबाबतची तक्रार केली होती. यात निखील उंद्रे दोषी आढळल्याने, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी निखील उत्तम उंद्रे यांना सरपंचपदावरुन हटविण्याबरोबरच, त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश आहेत.
मांजरी खुर्द येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उंद्रे यांनी 22/03/2021 रोजीच्या ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत एका शाळेबाबत बेकायदा ठराव झाल्याची तक्रार पंचायत समितीकडे केली होती. सदर सभेच्यावेळी निखील उंद्रे सदस्य म्हणुन कार्यरत होते. यावेळी सदस्य या नात्याने वरील ठरावाला उंद्रे यांनी मान्यता दिली होती. पंचायत समितीने केलेल्या चौकशीत संदीर उंद्रे यांनी केलेले आरोप खऱे ठरल्याने, आयुक्त सौरभ राव यांनी वरील कारवाई केली आहे.