पुणे : शिवाजी पार्कसाठी शिंदे गटानेही हायकोर्टाचे दार ठोठावले होते. मात्र तिन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर शिंदे गटाची याचिका उच्च न्यायलयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर शिंदे गटाला दसरा मेळावा घेता येणार नाही. शिवतिर्थावर दसरा मेळावा घेण्याबाबत सुरु असलेल्या वादासंदर्भात आज कोर्टात सुनावणी संपली आहे.
याचिकेत म्हटल्याप्रमाणे ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याची सुनावणी करताना न्यायालयाने सर्वात आधी शिवाजी पार्क मैदानासाठी कोणी अर्ज केला असा प्रश्न विचारला. यावर ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय म्हणाले, ठाकरे गटाने २२ आणि २६ ऑगस्टला अर्ज केला होता. शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी ३० ऑगस्टला अर्ज केला होता.
सरवणकरांनी अर्ज केला केवळ हेच कारण मनपा सांगत आहे. जर त्यांची कायदा सुव्यवस्था खराब असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. रेकॉर्ड पाहिले तर आम्हाला शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी मिळायला हवी. शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, देसाई यांच्याकडे शिवसेनेचे कोणतेही पद नाही. त्यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेसाठी परवानगी मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आपला शिंदे गट आहे हीच खरी शिवसेना. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी परवानगी शिंदे गटाला दिली पाहिजे असे शिंदे गटाच्या याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगीसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. असे म्हणत मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते.