Thane News : ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. याच मुद्द्यावरून काही ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची उदाहरणे समोर आलेली असतानाच, आता कल्याण-डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपचे दोन नेते समोरासमोर आल्याचे चित्र आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी कल्याण-डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी गल्लीतल्या नेत्यांनी मर्यादा संभाळून बोलावं, असा खोचक सल्ला संजय केळकर यांना दिला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. तर लोकसभा मतदारसंघावर हक्क सांगण्याचा हा वाद विकोपाला जाणार का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. (Two alliance leaders face off for Kalyan-Dombivli; Will the dispute be resolved before the election?)
हा वाद विकोपाला जाणार का?
भाजप आणि शिंदे गटाची युती असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इतरांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी नेते आहेत, हिंदुत्वाचा विचार मांडणारे नेते आहेत, असे विधान केले आहे. (Thane News) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे सरकार अपेक्षित होते, तेच राज्यात आहे. म्हणूनच आम्ही सत्तेवर आहोत, असं फडणवीस यांनी सांगितल्याचे म्हस्के म्हणाले.
दरम्यान, भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यावर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार टीका केली. म्हस्के म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार केळकरांना पटलेलं नाही, हे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसून येत आहे. (Thane News) केळकरांचं बोलण सीरियसली घेण्याची गरज नाही, असंही म्हस्के म्हणाले. ज्येष्ठ नेते निर्णय घेतात तेव्हा गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. मर्यादा सांभाळून बोललं पाहिजे. सत्तेचा लाभ अनेकांना झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे तरुण खासदार आहेत. हजारो करोडो रुपयांची काम त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केली आहेत. रेल्वेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आपले मुख्यमंत्री असताना टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात काय केलं? तरुण मुलाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. (Thane News) असं वाईट वाटून घ्यायची गरज नाही. निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष आम्ही एकत्र येऊन काम करत असतो. दोन्ही पक्षांची ताकद असते. ठाणे, कल्याण, पालघर कोणाची ताकद होती हे सगळ्यांना माहीत आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : वारीवर हल्ला हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक? प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल!