(Politics news): ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर त्यांनी लोळण घेतली आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे सगळं केलं आहे. त्यामुळे गद्दार दिवस ठाकरे गटाने साजरा केलाच पाहिजे, असे म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठआकरे गटाला गद्दार दिवस साजरा करण्यासाठी पाठिंबा दिला.(Politics news)
ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खोके दिन साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी आजचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी शिंदे गटाचा निषेध करण्यात येत आहे. हा दिवस साजरा करण्याला केसरकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे.(Politics news)
बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण. ठाकरे गट हे सगळं विसरला आहे. ते शंभर टक्के फक्त राजकारण करत आहेत. १०० टक्के राजकारण करणाऱ्यांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही. आम्ही कामातून त्यांना चोख उत्तर देऊ. बाळासाहेब ठाकरे बोलले होते की, मला एक दिवस पंतप्रधान करा.(Politics news) मी ३७० कलम रद्द करतो. मी राम मंदिर बांधून दाखवतो. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आहे. बाळासाहेबांबद्दल मोदींना किती आदर आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, असंही केसरकर म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आणखी काही नेते शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. याबाबत विचारले असता, केसरकर म्हणाले की, खूप लोक येणार आहेत. कोणा-कोणाची नावं सांगू? शाळेची वाढणारी फी यावरही केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाळेचा फ्री संदर्भात काही ठिकाणी गैर प्रकार आढळल्यास यासाठी आम्ही एक कमिटी स्थापन करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.(Politics news)
नवीन शैक्षणिक धोरणाचा मंत्र, रन फॉर एज्युकेशन हा आहे. शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. हा कार्यक्रम मुंबईमध्ये घेतला असता, परंतु रामशेठ ठाकूर हे लोकनेते आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करून ग्रामीण भागातील मुलांना चांगला शिक्षणाचा लाभ दिलेला आहे. फायनान्शियल हब पनवेल बनणार आहे, असं केसरकरांनी सांगितलं.
————-