मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव निधीमध्ये घोटाळा झाल्या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती.
बोगस तक्रारदार उभे करून संजय राऊत यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलीस यांनी १ मार्च रोजी सत्र न्यायालयात व १० मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत न्यायालयाची फसवणूक केल्याचा गंबीर आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
२१ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रारदार पंढरीनाथ शंकरराव साबळे यांच्याकडून आलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नील सोमय्या, किरीट सोमय्या व निकॉन इन्फ्रा यांच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले होते.
माझ्या विरोधात तक्रार करण्यात आली असल्याने मी दोन महिन्यांपासून तक्रारदाराला शोधत असून त्याचा पत्ता बोगस आहे. संपर्क क्रमांकावर देखील तो उपलब्ध नाही.
त्यामुळे तक्रारदार जिवंत आहे की नाही, खरा आहे बोगस हे फक्त संजय राऊत व उद्धव ठाकरे हेच सांगू शकतील असे किरीट सोमय्या म्हणाले.