नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री यांची तब्येत अचानक खराब झाली असून सिलिगुडी येथे भाषण करताना हा प्रकार झाल्याची माहिती समोर येत आहे. भाषण करताना अचानक नितीन गडकरी यांना भोवळ आली आणि ते खाली बसले. त्यानंतर त्यांना नजीकच्या रुग्णालयातील पथक कार्यक्रमस्थळी पोहोचले.
गडकरी यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्याने त्याच्या प्रकृती खालावली असल्याच्या प्राथमिक माहिती मिळाली असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील गडकरी यांच्याशी फोनवर संवाद साधताना त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी शिवमंदिर ते सेवक छावणीपर्यंतच्या रस्त्याच्या उदघाटनासाठी गेले असताना ही घटना घडली. यावेळी दार्जिलिंग जंक्शन जवळ असणाऱ्या डागापूर येथील मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.