(Sudhir Mungantiwar) पुणे : गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास किमान तीन महिने कारावास व किमान दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असून हेरिटेज मार्शल नेमण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
‘काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली’
राज्यातील गडकिल्ल्यांच्या संरक्षणाबाबत काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. ‘ज्या गडकिल्ल्यांनी वीररस पाहिला तिथे समाजातील काही प्रवृत्तींकडून सोमरस घेतला जातो असे प्रकार दिसून आले आहेत. त्याविरुद्ध कडक कायदा बनवला गेला तर गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी हेरिटेज मार्शल उपलब्ध होऊ शकतील, असे ते म्हणाले.
राज्यातील सर्व 387 स्मराकांवर QR कोड सह माहिती फलक लावण्याचे काम या वर्षभरात पूर्ण करत आहोत..#BudgetSession2023 pic.twitter.com/3svCsdT0vg
— Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar) (@SMungantiwar) March 13, 2023
राज्यात ३८७ संरक्षित स्मारके आहेत. मागील सरकारच्या काळात या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्षच झाले होते. निधीदेखील पुरेसा दिला जात नव्हता. आता मात्र जिल्हा नियोजनपैकी सुमारे ५१३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. ७५ स्मारकांच्या ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले असून त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
दम्यान, सर्व ३८७ स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Sharad Pawar : गळ्यात कांद्याच्या माळा घालणारे भाजपवाले कुठे गेले ?? शरद पवारांचा सवाल
Accident News : जुना पुणे-मुंबई महामार्गावर अपघात; भरधाव बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू;