सुरेश घाडगे :
परंडा : परंडा आगाराला लांब पल्ल्याच्या नविन बस सुरू कराव्यात, आणि बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहिम राबवावी व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा आगार व्यावस्थापक राहूल वाघमोडे यांना गुरुवारी ( ता. २८ ) दिले आहे.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे, धनंजय पौळ,दीपक पौळ, सुहास पाटील,अजय घोडेस्वार, संदीप बनसोडे, गोवर्धन शिंदे, स्वप्नील पौळ,परमेश्वर शिंदे आदि उपस्थित होते .
या निवेदनात म्हटले आहे कि, परंडा आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस नवीन सोडाव्यात. लांब पल्ल्याच्या नवीन व बंद पडलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरु कराव्यात. परंडा ते मुंबई, उस्मानाबाद ते सुरत, परड़ा ते कोल्हापूर, परंडा ते पुणे डोंजा मार्गे, परंडा ते उदगीर या नवीन बस फेऱ्या सुरू कराव्यात.
दरम्यान, परंडा बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची प्रवाशांसाठी तात्काळ सोय करण्यात यावी. बस स्थानक परिसर स्वच्छता करावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा आगारा समोर धरणे आंदोलन करण्यात येईल.