अरुण भोई
Daund News : दौंड / दौंड तालुक्यातील मलठण राजेगाव येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नेत्र चिकित्सा तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, चष्मे वाटप, मधुमेह व हृदयरोग तपासणी, रक्तातील साखर तपासणी करण्यात आली.(Daund News)
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोगनिदान शिबिर.
बुधरानी हॉस्पिटलचे डॉ.नितीन काळे, डॉ. पाटील तसेच मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद रंधवे यांनी रूग्णांची तपासणी केली. या शिबिरात ३६० रूग्णांनी तपासणी करून घेतली. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी शरदचंद्र सुर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल मलठण ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.(Daund News)
यावेळी भिमथडी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक सदाशिव मांडगे, सरपंच हनुमंत कोपनर, माऊली चव्हाण, बापू येवले, नामदेव आहेर, नाना कांबळे, रामभाऊ शेळके, पोलीस पाटील संजय लोंढे, नवनाथ वाघमोडे, किरण वाघमोडे, पापा परदेशी, लक्ष्मण सरोदे, घनवट, बापू बोरकर, ज्योती बोरकर उपस्थित होते. शिबिराचे आयोजन शिवसेना डॉक्टर सेनेचे दौंड तालुका प्रमुख डॉ.प्रमोद रंधवे यांनी केले होते.(Daund News)