हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोमनाथ माणिकराव कोतवाल यांची शुक्रवारी (ता. ११) बिनविरोध करण्यात आली. उपसरपंच सुभाष बारीकराव कोतवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच अश्विनी कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत सोमनाथ कोतवाल यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी कोतवाल यांनी सोमनाथ कोतवाल यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी जालिंदर बोरावणे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, माजी सरपंच नितीन मेमाणे, कविता जगताप, सुखदेव कोतवाल, प्रकाश जगताप, माजी उपसरपंच शामराव कोतवाल, दत्तात्रय कटके, आबासाहेब कोतवाल, सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेश कोतवाल, कालिदास कोतवाल, संजय कोतवाल, विनायक कोतवाल, दिंडीचे माजी अध्यक्ष आबासाहेब कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोतवाल, संजय कोतवाल, गणेश कोतवाल, अलका कोतवाल, पुष्पा कोतवाल, रेश्मा ढवळे, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल, डॉ. मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव रोहिदास कोतवाल, नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप रायकर, लोणीकंदचे उपसरपंच नंदू कंद, माजी उपसरपंच सुनील गोते, माजी उपसरपंच सुनील कंद, आदी ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच सोमनाथ कोतवाल निवडीनंतर म्हणाले, “गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.”