अजित जगताप
वडूज : राजकारणात कालचा शत्रू आज मित्र बनू शकतात तर मित्रही राजकीय शत्रू होऊ शकतात. त्यामुळे गड्या आपुला पक्ष व आपुली आघाडी बरी असा सूर उमटू लागला आहे. पक्षीय पातळीवर सर्व आलबेल असल्याने अनेक जण संभाव्य आघाडीतून लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा उघडपणे होऊ लागली आहे.
खटाव तालुक्यात पक्षीय पातळीवर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्ष,शिवसेना अशी प्रमूख पक्षाची बांधणी आहे. इतर पक्षाची ताकद असली तरी सर्व खटाव तालुक्यात उमेदवार उभे करून निवडून आणणे. दुरापास्त असले तरी काही ठिकाणी निकाल बदलण्याची ही ताकद विशेषतः सर्वसाधारण आरक्षित गटात छोट्या पक्षाची निश्चितच आहे.
सध्याच्या घडीला पारंपरिक पद्धतीनेच लढत झाली तर तिसरा पर्याय म्हणून आघाडीला महत्व प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने आघाडीचे बोलणी प्राथमिक स्वरूपात होईल का? हा यज्ञ प्रश्न आहे.परंतु, पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यास मतदारांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची दमछाक होण्याची दाट शक्यता आहे.
या मतदारसंघात आरक्षण व स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. या घडामोडीत पहिली विचारविनिमय बैठक सातेवाडी ता खटाव येथे घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तूर्त आघाडी घेतली आहे.त्या पाठोपाठ राष्ट्रीय काँग्रेस पक्षानेही वडूज येथे बुधवारी दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. तसा काँग्रेस कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून निरोप सुध्दा देण्यात आला आहे. अशी माहिती काँग्रेसचे क्रियाशील सदस्यांनी दिली आहे. तसेच या बैठकीला हजर राहणार असल्याचे ही सांगितले.
सातारा जिल्हा परिषद खटाव, बुध,पुसेगाव,मायणी, पुसेसावाळी, निमसोड गट सर्वसाधारण खुला असून इतर मागासवर्गीय महिलांसाठी सिद्धेश्वर कुरोली,सर्वसाधारण महिलांसाठी औंध आरक्षित आहे.जिल्हा परिषद गटात मागासवर्गीय कार्यकर्त्यांची भ्रमनिरास झाली असून त्यांना खुल्या गटात उमेदवारी करावी लागणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांसाठी निमसोड, कुरोली, गुरसाळे, जायगाव, मायणी व सर्वसाधारण मध्ये खटाव, बुध, विसापूर,कलेढोण व पुसेसावाळी,म्हासूणे इतर मागासवर्गीयसाठी डिस्कळ, पुसेगाव, तडवळे,इतर मागासवर्गीय महिला एनकुळ,सर्वसाधारण महिला गुरसाळे, जायगाव, निमसोड, मायणी, सिद्धेश्वर कुरोली आरक्षित आहे.
सर्वसामान्य कलेढोण, म्हासुणे, पुसेसावाळी, खटाव, विसापूर, बुध या ठिकाणी सर्वसाधारण व औंध मागासवर्गीय आरक्षित करण्यात आले आहे. सर्वच पक्षातील सक्षम कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांनी आपापल्या राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागणी करण्याची तयारी केली आहे.अध्याप काहींनी आपले पत्ते ओपन केले नाहीत. त्यानंतरच राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.