कोल्हापूर : सध्या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
कोल्हापुरातील भाजपाचे संघटनात्मक काम, कार्यकर्त्यांची ऊर्जा पाहिल्यानंतर कोल्हापूरमध्ये लोकसभेला निश्चित कमळ फुलेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी पक्षाकडून माझी निवड करण्यात आली आहे. दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
कार्य्रकर्ते आणि समाजातील विविध घटकांशी चर्चेनंतर भाजपच्या वतीने राबविण्यात आलेले उपक्रम हे जनतेच्या मनात नक्कीच जागा मिळविण्यासाठी यशस्वी ठरले आहेत, असे ते म्हणाले.
कोल्हापुरात थोर मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिंदे यांनी आदरांजली वाहिली.
‘आक्रमणमुक्त भारतासाठी शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे इंग्रज आणि मुघलांपासून लढले आणि यश मिळवले, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर कायम राहील.’ असे ट्विट त्यांनी कोल्हापूर दौऱ्याचा उल्लेख करताना केले.