उरुळी कांचन, (पुणे) : कोणी कुठेही जाऊद्यात निष्ठावंत शिवसैनिक हेच शिवसेनेचे बलस्थान आहे. शिवसेना फक्त पक्ष नसुन तो एक विचार आहे. तो विचार ज्यांना पटला ते शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटले असे मत शिवसेना हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या संदर्भात निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांना माहिती देताना काळभोर बोलत होते.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव, पुणे जिल्हासंघटक रमेश भोसले, युवा सेना जिल्हा समन्वयक प्रताप कांचन, तालुका प्रमुख महिला आघाडी छाया महाडिक, उपविभाग प्रमुख महिला आघाडी तालुका संघटक शुभांगी बागडे, तानाजी कुंजीर, अजित गायकवाड, विजय बगाडे, रमेश भामगर, शरद माने, राहुल काकडे, सचिन कांचन, अविनाश वाल्हेकर,राहुल चौधरी, बाळासाहेब कांचन,
संजय कुंजीर, माऊली ठोंबरे, समाधान अवचट, सागर चौधरी, शरद कोलते, शरीफ शेख, आदी हवेलीतील शिवसैनिक उपस्थित होते.
यापुढे बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले की, शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करावी. तसेच लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा. शिवसेना मध्ये जरी फूट पडली असेल तरी हवेली तालुक्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून साथ देईल तसेच पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर व जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका तसेच सर्व आगामी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सर्व निवडणुका ही शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार आहे.