मुंबई : शिवसेनेत पडलेला फुटीला उद्धव ठाकरे व मी जबाबदार आहे, असा खुलासा माजी पर्यावरण मंत्री व वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.
राजकारण हे खूप घाणेरडे ठिकाण नाही किंवा लोकांची कामे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस चिखलात उतारावेच लागते असे काही नाही, असे आम्हाला सातत्याने वाटत होते. मात्र तीच आमची सर्वात मोठी चूक होती, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे याम्नी सर्वांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमच्यातीलच समजत होतो, मात्र, त्यांनी आमच्यावर पाठीमागून वार करतील असे वाटले नव्हते, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच राज्य सरकारच्या सध्याच्या कामगिरीवर सडकून टीका केली.
दरम्यान, मध्यावधीसाठी भाजपला दोष देणार का, असा सवाल त्यांना केला असता आदित्य ठाकरे म्हणाले की मी त्यांच्यासारखे घाणेरडे राजकारण करत नाही. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. असे देखील ते म्हणाले आहे.