मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला काल सोमवारी (ता.१०) मशालीचे चिन्ह दिले होते. तर शिवसेना शिंदे गटाला आज मंगळवारी (ता.११) निवडणूक आयोगाने ढाल-तलवारीने चिन्ह दिले आहे.
निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांना तात्पुरत्या स्वरुपात नवे नाव आणि नाव चिन्ह दिले आहे. निवडणूक आय़ोगाने उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले होते. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आणि चिन्हासाठी नवे तीन पर्याय सादर करण्यासाठी सांगितले होते. तर आज शिंदेंना ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे गट ढाल-तलवार घेऊन तर उद्धव ठाकरे गट मशाल चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे चिन्हाचा वाद तात्पुरता मिटला आहे.