पुणे : शिवसेना नेते विजय शिवतारे हे नेहमीच पवार कुटूंबियांना नेहमीच घेरण्याच्या प्रयत्नात असतात. आता असाच एक आरोप करुन शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पुन्हा एकदा सुळे वादात अडकल्या आहेत.
शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी सुळेंचा एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यात आधी मटण खाल्लं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी महादेवाचं दर्शन घेतले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मटण खाल्यानंतर भैरवनाथ मंदिर, महादेव आणि संत सोपानकाकांचे दर्शन घेतल्याचा आरोप सुप्रिया सुळेंवर केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुप्रिया सुळेंचे महादेवाचे दर्शन घेतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यातून ही टीका करण्यात आली आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे शिवतारेंनी यांनी म्हटले आहे.
याचे कारण असे की, महादेवाचे दर्शन घेण्याआगोदर सुळेंनी मटन खाल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. आरोप करत त्यांनी सुप्रिया सुळेंचा मटण खाताना व्हिडिओ आणि मंदिरात घेतलेले दर्शन याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट केलेत. त्यामुळे सुप्रिया सुळे वादात अडकण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व प्रकरणावरसुप्रिया सुळेंची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दरम्यान, शिवतारेंच्या आरोपामुळे काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजय शिवतारेंनी म्हटले आहे की, आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला अशी टीका त्यांनी केली. सुप्रिया सुळे लोकसभेच्यानिवडणुकीपूर्वी मतदारसंघात सक्रीय झाल्या आहेत. मतदारसंघात फिरताना त्या स्थानिकांशी संवाद साधतात. सोशल मिडियावर व्हायरल केलेला व्हिडिओ आणि फोटो पुण्यातील असल्याचे बोलले जात आहे.
हिंदू महासंघाचे आनंद दवेंचा सुप्रिया सुळेंना सल्ला
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच शरद पवार यांच्या हिंदू धर्म शिकावा असास सल्ला आनंद दवे यांनी दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा या शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंनी शिकायला हव्यात. मी नॉनव्हेज खाल्लंय असं म्हणून मंदिरात जाणार नाही असं म्हणणाऱ्या पवारांची मुलगी सुप्रिया सुळे नॉनव्हेज खाऊन जाणुनबुजून मंदिरात जात दर्शन घेतात. फोटो काढतात. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचं काम मुद्दामाहून राष्ट्रवादीकडून सुरू आहे, असा आरोप आनंद दवे यांनी केला.
सुप्रिया सुळेंनी शिवतारेंच्या आरोपावर दिली प्रतिक्रिया
मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला होता. त्यावर “मी याबाबत काहीही बोलू शकत नाही. कारण याबाबत मला काहीही माहिती नाही. आज महागाई, बेरोजगारी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत” असे सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.